मनसे नेते शिशीर शिंदे यांनी केला शिवसेनेत प्रवेश
MahaNews LIVE
मुंबई : आज मनसेचे नेते शिशीर शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत आयोजित शिवसेनेच्या 52 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिशीर शिंदेनी पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांनी छोटेखानी भाषण करुन आपल्या भावनाही व्यक्त केल्या. हो मी चुकलो, शिवसैनिकांनो, मला माफ करा, बारा वर्षांपूर्वी शिवसेना सोडणं ही माझी चूक होती, असे म्हणत शिशीर शिंदे पुढे म्हणाले, यापुढे शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. उद्धव ठाकरे यांनी शिशीर शिंदेंच्या मनगटावर शिवबंधन बांधून, हातात भगवा झेंडा देऊन, त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला.

- Comments
- Leave your comment