पेज३

रणबीरने दिले सलमानच्या कमेंटवर प्रत्युत्तर

MahaNews LIVE
Jun 19 / 2018

मुंबई: संजू या संजय दत्तचा बायोपिकच्या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरवरुन रणबीर कपूरच्या अभिनयाचं सर्वांनी कौतुक केले आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला रणबीरच्या अभिनयाबद्दल विचारलं होतं,तेव्हा सिनेमाचा शेवटचा भाग स्वत: संजय दत्तने करायला हवा होता, असं सलमान म्हणाला होता.सलमानच्या या प्रतिक्रियेवर रणबीर कपूरचीही प्रतिक्रिया देताना म्हटले की आजपर्यंत कोणीही स्वत:च्या बायोपिकमध्ये स्वत:च भूमिका केलेली नाही. तसं झालं तर त्या पात्राचा परिणाम दिसत नाही. मला माहित आहे की माझी तुलना संजय दत्तसोबत होणारच. त्यामुळे मी खूप कष्ट केले असून, त्या पात्राला योग्य न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

रणबीरने दिले सलमानच्या कमेंटवर प्रत्युत्तर
Categories : पेज३ Tags : पेज३
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *