कोल्हापूर

छत्रपती चिमासाहेब फेरीवाला संघटनेचे लक्ष्मीपुरी पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन

MahaNews LIVE
Jun 19 / 2018

कोल्हापूर : सीपीआर, टाऊन हॉल परिसरातील फेरीवाल्यांकडे महापालिकेचे रीतसर परवाने आहेत. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीस अडथळा होत असल्याचे कारण पुढे करत येथील फेरीवाल्यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान महापालिकेने फेरीवाल्यांचा सर्वे करून त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करेपर्यंत या फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, या मागणीचे निवेदन छत्रपती चिमासाहेब फेरीवाला संघटना यांच्यावतीने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांना देण्यात आले यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर उपस्थित होते. यावेळी फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती चिमासाहेब फेरीवाला संघटनेचे लक्ष्मीपुरी पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *