थोडक्यात महत्वाचे

ढोंगीबाबांना भर चौकात फाशीची शिक्षा करा – रामदेव बाबा

MahaNews LIVE
Jun 19 / 2018

कोटा : साधूसंतांना साधूच्या वेशातील काही लोक बदनाम करत असून अशा लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, असे मत योगगुरु रामदेव बाबा यांनी मांडले आहे. आपल्या देशात साधूसंतांची एक परंपरा असून कोणीही त्या परंपरेला धक्का लावू नये असेही योगगुरु रामदेव बाबा म्हणाले आहेत. राजस्थानमधील एका तरुणीने दिल्लीतील दाती महाराज या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरुविरोधात बलात्काराची तक्रार केली आहे. दाती महाराजांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दाती महाराजांचा सध्या पोलीस शोध घेत असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर रामदेवबाबा यांनी कोटा येथे माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

ढोंगीबाबांना भर चौकात फाशीची शिक्षा करा – रामदेव बाबा
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *