मुंबई

भाजप सरकारने केली आंबेडकरी जनतेची फसवणूक: आमदार प्रकाश गजभिये

MahaNews LIVE
Jun 19 / 2018

मुंबई : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जमीन हस्तांतरीत नसतांना व नकाशा मंजूर नसतांना सुध्दा देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते दिनांक 11 नोव्हेंबर 2015 ला मोठया थाटामाटात करोडो रूपये खर्च करून भुमीपूजन करण्यात आले. यावेळी 14 एप्रिल पूर्वी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामास सुरूवात होणार असल्याची घोषणाही झाल्या. पण प्रत्यक्षात आंबेडकरी जनतेची चक्क फसवणूक झाली आहे. आज विधानभवनात झालेल्या विनंती अर्ज समितीच्या बैठकीत अधिका-यांच्या उत्तरात उघडकीस आले, भाजप सरकारने राज्यातील करोडो आंबेडकरी जनतेचा विश्वासघात केला आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यंानी केला.

भाजप सरकारने केली आंबेडकरी जनतेची फसवणूक: आमदार प्रकाश गजभिये
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *