कोल्हापूर

अंधत्वावर मात करत 12 वी उत्तीर्ण ; आमदार पाटील यांच्याकडून संगणक भेट

MahaNews LIVE
Jun 18 / 2018

कोल्हापूर : जन्मजात आलेले अंधत्वावर मात करत जिद्दीच्या जोरावर कसबा बावडा इथील फातिमा नौशाद मुल्लाणी हिने 12 वी कला शाखेत 77 % गुण मिळवले. या तिच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन म्हणून आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आज तिला संगणक प्रदान करण्यात आला. शिवाय भविष्यात तिच्या करिअरसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देखीलयावेळी आमदार सतेज पाटील यांनी दिली. आमदार सतेज पाटील यांनी मुल्लाणी कुटुंबीया बद्दल दाखविलेल्या आपुलकीमुळे, मुल्लाणी कुटुंबीय भारावून गेले होते. यावेळी नगरसेवक मोहन सालपे, अशोक जाधव, श्री राम सोसायटीचे सभापती मदन जामदार, माजी नगरसेवक मुस्ताक मोमीन, पापालाल मिस्त्री, यांच्यासह मुल्लांनी कुटुंबीय आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

अंधत्वावर मात करत 12 वी उत्तीर्ण ; आमदार पाटील यांच्याकडून संगणक भेट
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *