कोल्हापूर

युवकांना काँग्रेस पक्षाचे सभासद करुन घेण्याचे आवाहन

MahaNews LIVE
Jun 18 / 2018

रत्नागिरी प्रतिनिधी:- काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी पक्षात सामिल होवून देशाची सेवा करावी असे आवाहन युवक काँग्रेसचे विभागीय निरीक्षक अँड. जोशी यांनी काँग्रेस भुवन येथे केले. रत्नागिरीतील काँग्रेस भुवन येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच युवक काँग्रेसच्या सभासद नोंदणीबाबत माहिती देण्यासाठी अँड.जोशी यांनी वरिलप्रमाणे आवाहन केले. यावेळी प्रदेश महिला काँग्रेस चिटणीस रुपाली सावंत, महिला जिल्हाध्यक्षा अँड.अश्विनी आगाशे, ज्येष्ठ नेते व बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, बंटी वणजू, अमित नागवेकर, पप्पू तोडणकर, कपिल नागवेकर आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. गेली चार वर्षे भाजप च्या नेतृत्वाखाली देश पिछाडीवर गेलेला आहे. बेरोजगार युवकांना दरवर्षी दोन कोटी युवकांना नोक-या उपलब्ध करुन देण्याची घोषणा अद्याप अंमलात आलेली नाही. त्यामुळे युवक वर्गात असंतोषाचे वातावरण आहे. याचा फायदा घेवून जिल्ह्यातील सर्व युवकांना काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याची कामगिरी पार पाडावयाची आहे. युवक काँग्रेसची सभासद नोंदणी सुरु झाली असून नोंदणीची अंतिम तारिख ९ जुलै २०१८ आहे. तरी या जिल्ह्यात जास्तित जास्त तरुण व तरुणींना सभासद करुन घ्यावे व पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांचे हात पक्षाच्या माध्यमातून मजबूत करावेत असे आवाहन अँड.जोशी यांनी केले.

युवकांना काँग्रेस पक्षाचे सभासद करुन घेण्याचे आवाहन
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *