थोडक्यात महत्वाचे

धुळ्यात जमावाच्या दगडफेकीत डीवायएसपींसह सात पोलीस कर्मचारी जखमी

MahaNews LIVE
Jun 18 / 2018

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दुर्बळया येथे कौटुंबीक वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना आज दुपारी घडली. या हल्ल्यात पोलीस उपाधीक्षकांसह सात पोलीस जखमी झाले आहेत.दुर्बळया येथे काही दिवसांपूर्वी एका पुरुषाने आत्महत्या केली. त्याच्या नावावरील मालमत्ता हस्तांतरित करण्याच्या कारणावरुन त्याचे आई-वडील आणि सासरच्या मंडळीत वाद सुरु होता.एपीआय किरणकुमार खेडकर यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही पक्षांनी सामोपचाराने तोडगा काढण्याचं मान्य केलं.बैठकीत बंदोबस्त ठेवण्यासाठी डीवायएसपी संदीप गावित, एपीआय किरणकुमार खेडकर हजर होते. बैठक सुरू असतानाच तेथील महिलांच्या जमावातून पोलिसांवर अचानक दगडफेक सुरू झाली. या हल्ल्यात डीवायएसपी संदीप गावित, एपीआय किरणकुमार खेडकर यांच्या हातावर मार लागला. हवालदार संजय नगराळे, श्यामसिंह वळवी, अनंत पवार हे मारहाणीत जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धुळ्यात जमावाच्या दगडफेकीत डीवायएसपींसह सात पोलीस कर्मचारी जखमी
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *