कोल्हापूर

न्यु.पॅलेस परिसरातून ४ चंदन झाडे लंपास

MahaNews LIVE
Jun 18 / 2018

कोल्हापूर : शहाजी छत्रपती म्युझियम न्यु. पॅलेस परिसरातील चंदनाची चार झाडे अज्ञात चोरट्यांनी कापून नेल्याचा प्रकार रविवारी घडला. या प्रकरणी सुरक्षा रक्षक सतीश मारुती शिंदे (वय ४६ रा. राजारामपुरी) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. न्यु.पॅलेस परिसरात वेगवेगळ्या प्रकारची, जातीची झाडे आहेत. रविवारी काही कर्मचाऱ्यांना सुट्टी असते. याच संधीचा फायदा घेवून चोरट्यांनी १० हजार रुपये किंमतीची चंदनाची लहान चार झाडे कापून नेली. सोमवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर सतीश शिंदे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

न्यु.पॅलेस परिसरातून ४ चंदन झाडे लंपास
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *