कोल्हापूर

अंध अपंग तरुणावर लैंगिक अत्याचार प्रकरणी एकाला अटक

MahaNews LIVE
Jun 18 / 2018

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका अंध अपंग तरुणाच्या असहाय्यतेचा गैर फायदा घेत एका विकृत नराधमाने त्यावर लैंगीक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे. या तरुणाने दाखवलेल्या धिरा मुळे हे प्रकरणा समोर आलं असुन अत्याचार करणा-या नराधमास जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. शेखर शामराव साळवी ( वय 35 राहणार दिलबहार तालीम मूळ गाव रा. सावंतवाडी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. हातात पांढरी काठी घेवून दिवसभर रसत्यावर चाचपडत आगरबत्ती विकून हा तरुण आपल्या कुटुंबालाही हात भार लावतोय..मात्र त्याच्या अंधपणाचा गैरफायदा एका विकृत नराधमानं घेतला आहे. रविवारी दुपारी हा तरुण अगरबत्ती विकून घरी जात असताना त्या नराधमाने त्याला गाडीवरून घरी सोडतो असं म्हणात गाडीवर बसवलं, त्या नंतर तो त्याला एका अनोळखी ठिकाणी घेवून गेला. त्या ठिकाणी त्याने या तरुणाचे लैंगीक शोषण केले, आणि त्या नंतर त्याला रस्त्यात सोडून पळून गेला. असहाय्या वेधना सहन करत या तरुणाने याच परिसरातील माजी नगरसेवक आदिल फरास यांना फोन करुन घडलेली घटना सांगितली. परिस्थितीचे गांर्भिय ओळखून आदिल फरास यांनी या तरुणाला घेवून राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानुसार पोलसांनी शेखर शामराव साळवी याला ताब्यात घेतले.

अंध अपंग तरुणावर लैंगिक अत्याचार प्रकरणी एकाला अटक
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *