मुंबई

शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांना मिळणार राज्यमंत्रिपदाचा दर्जा

MahaNews LIVE
Jun 18 / 2018

मुंबई - येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष, शिवसेनेचे सचिव तसेच अभिनेते असलेले आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अभिनय क्षेत्रातून आपल्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात केलेल्या बांदेकरांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला. अद्यापही बांदेकर हे शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष असल्याने त्यांना हा दर्जा देण्यात आल्याचे शासन आदेशात सांगण्यात आले आहे. मध्य प्रदेश सरकारने काही महिन्यांपूर्वी पाच आध्यात्मिक गुरुंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. यामध्ये भय्यू महाराज, नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कॉम्प्युटर बाबा आणि पंडित योगेंद्र महंत यांचा समावेश आहे. मात्र यातील भय्यू महाराजांनी राज्यमंत्रिपदाचा दर्जा नाकारला होता. दरम्यान, आदेश बांदेकर यांनी दादरमधून मनसेचे नितीन सरदेसाई यांच्याविरोधात शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती.या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. झी मराठी वाहिनीवरील होममिनिस्टर या लोकप्रिय कार्यक्रमाचे ते सुत्रसंचालन करतात. या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले आहेत.

शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांना मिळणार राज्यमंत्रिपदाचा दर्जा
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *