पेज३

कचरा फेकणाऱ्या मुलाच्या आईने केली विराट-अनुष्कावर जोरदार टीका!

MahaNews LIVE
Jun 18 / 2018

मुंबई :क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी व बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा नुकताच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या प्रवाशांना दम भरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता पण त्या व्हिडीओवर आता कचरा फेकणाऱ्या मुलाच्या आईने झाल्या प्रकारावर प्रतिक्रिया देताना विराट-अनुष्का वर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित अरहान सिंह या रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलाच्या आईने विराट आणि अनुष्कावर राग व्यक्त केला आहे. या दोघांनी मिळून माझ्या मुलाचा वापर प्रसिद्धी मिळवण्यासाठीच केला आहे. सफाईच्या नावावर असा व्हिडीओ बनवून एखाद्याची बदनामी करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं या पोस्टमधून त्यांनी सुनावलं आहे. व्हिडीओ शेअर करताना मुलाचा चेहरा किमान झाकला जावा याची खबरदारी घ्यायला हवी होती.तुम्हाला जर सफाईची एवढीच आवड असेल तर आधी तुम्ही राहत असलेल्या परिसराची स्वच्छता करा, असा सल्ला या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी विराट आणि अनुष्काला दिला आहे.

कचरा फेकणाऱ्या मुलाच्या आईने केली विराट-अनुष्कावर जोरदार टीका!
Categories : पेज३ Tags : पेज३
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *