मुंबई

मेट्रो 3 च्या सीएसटी ते मुंबई सेंट्रलच्या भुयाराचं काम पूर्ण

MahaNews LIVE
Jun 18 / 2018

मुंबई : मेट्रो तीन अंतर्गत येणाऱ्या सीएसटी ते मुंबई सेंट्रल दरम्यान रेल्वेकडून नुकतेच एका भुयारी मार्गाचे काम पुर्ण करण्यात आले.मेट्रो 3 च्या भुयारी मार्गाच्या कामाने वेग धरला आहे.टनेल बोरींग मशीन्सच्या (टीबीएम्स) सहाय्याने या भुयाराचं काम करण्यात आले. या भुयाराची लांबी एकूण 860 मीटर आहे.याच प्रकल्पात आणखी एक बोगदा तयार करण्यात येणार आहे. भुयार सात हजार सहाशे चाळीस मीटर लांबीचे असणार आहे. टीबीएमद्वारे मुंबई सेंट्रलपर्यंत ह्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

मेट्रो 3 च्या सीएसटी ते मुंबई सेंट्रलच्या भुयाराचं काम पूर्ण
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *