कोल्हापूर

शिवशाही बसची कठडयाला धडक ; १३ जखमी; कणेरीवाडी येथील अपघात

MahaNews LIVE
Jun 17 / 2018

कोल्हापूर : शिवशाही आराम बस कोल्हापूरला येत असताना कणेरीवाडी (ता. करवीर) येथे  चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याच्या कठड्यावर आदळली. यामुळे बसमधील प्रवाशी समोरच्या सिटीवर आदळून तेरा प्रवासी किरकोळ जखमी झाले. केएमटी बसमधून जखमींना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले.चंदगड ते बोरीवली जाणाऱ्या बसमध्ये तीस प्रवासी कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करीत होते. कणेरीवाडी येथे बस येताच चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटून ती रस्त्याकडेच्या कटड्याला धडकली.    जखमी नावे अशी, बस चालक अतुल जगताप (वय ४०, माहुर-पुणे), प्रथमेश गंगाराम विसने (१७), दिपाली दिलीप पिळनकर (३०), पद्मा विष्णु रेडेकर (४९), विष्णु बापू रेडेकर (५६, सर्व रा. चंदगड), दिलीप लक्ष्मण पिळनकर (५५), रोहन श्रीकांत मूर्ती (२६), सुनिता तानाजी कोकीतकर (४३, सर्व. रा. गडहिंग्लज), श्रध्दा तानाजी कोकीतकर (२३), तानाजी आप्पा कोकीतकर (५८), सुरेश रेडेकर (५२, सर्व. रा. मुंबई), राणी रामचंद्र सुर्यवंशी (३२, रा. उचगाव), प्रसाद धनाजी अर्दाळकर (२७, ठाणे), सुनिता तानाजी कोकीतकर (४३, गडहिंग्लज). घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाणेत नोंद झाली आहे.

शिवशाही बसची कठडयाला धडक ; १३ जखमी; कणेरीवाडी येथील अपघात
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *