कोल्हापूर

विजेच्या धक्क्याने मजूर जखमी

MahaNews LIVE
Jun 17 / 2018

कोल्हापूर : घर बांधणी सुरू असताना लोखंडी सळीचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे बांधकाम मजूर शिवाजी श्रीपती हेगडे (वय ५०, रा. कागल) यांना विजेचा जोराचा धक्का बसला. यात ते गंभीर जखमी झाले. रविवारी दुपारी १२ वाजता कागल येथे हा प्रकार घडला. जखमी शिवाजी यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

विजेच्या धक्क्याने मजूर जखमी
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *