कोंकण

लांजा तालुक्यात गाडीचा हॉर्न वाजवल्यामुळे दोन हटात हाणामारी; एक जखमी

MahaNews LIVE
Jun 17 / 2018

लांजा प्रतिनिधी:- गाडीचा हॉर्न वाजवला म्हणून दोन गटात हाणामारी होऊन यामध्ये एकाला गंभिर दुखाप झाल्याने लांजा ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवार दिनांक १७ जून रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. सविस्तर हकिगत अशी की, फिर्यादी मोसिम कासम नाईक व आरोपीत जब्बार महंमदखान डबीर, शदान जब्बार डबीर, हयात जब्बार डबीर, सबा जब्बार डबीर सर्व फिर्यादी व आरोपीत प्रभानवल्ली, गणेशखोरवाडी ता.लांजा येथील रहिवासी असून एकमेकांचे शेजारी आहे. दिनांक १६ जून २०१८ रोजी १८ः०० वाजता फिर्यादी यांचा भाऊ सोपान अब्बास नाईक आपली मोटार सायकल घेवून खोरनिनको गेला असताना रस्त्यावरील आरोपीत यांनी रिक्षात बसले असताना गाडीचा हॉर्न वाजवला म्हणून त्यांनी फिर्यादीचा भाऊ सोपान अब्बास नाईक याला प्रभानवल्ली येथे जावून धक्काबुक्की केली. त्यावरुन फिर्यादी व आरोपी यांनी एकमोकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या. दि.१७ जून २०१८ रोजी सकाळी साडेआठ वाजता यातील फिर्यादी मोसिम कासम नाईक हे आपल्या बहिणीकडे वाडीत चालत जात असताना वरील आरोपीत यांनी आदल्या दिवशी हॉर्नवरुन झालेल्या ढकलाढकलीच्या रागातून आरोपींनी फिर्यादी यांना मारण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे जिवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये फिर्यादीला गंभिर दुखापत झाल्याने लांजा ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर घटनेची नोंद लांजा पोलिस स्थानकात गुन्हा रजिस्टर नंबर ५४/२०१८ प्रमाणे दाखल करण्यात आली असून आरोपींवर भा.द.वि.कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लांजा तालुक्यात गाडीचा हॉर्न वाजवल्यामुळे दोन हटात हाणामारी; एक जखमी
Categories : कोंकण Tags : कोंकण
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *