कोंकण

रत्नागिरी मारुतीमंदिर येथील पान टपरीत चोरी

MahaNews LIVE
Jun 17 / 2018

रत्नागिरी प्रतिनिधी:- रत्नागिरी येथील कोकण नगर येथील वसुराज बाबुराव बिरादर(वय-३३) यांच्या मारुती मंदिर येथील बसवेश्वर पान शॉप ही पानाची टपरी अज्ञात चोरट्याने फोडून त्यामधील अडीच हजार रुपयांची रोख रक्कम चोरली. ही घटना शनिवार दिनांक १६ जून रोजी रात्री ११ ते १७ जून रोजी सकाळी ७ः२० वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे वसुराज बाबुराव बिरादर यांनी आपल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या घटनेची तक्रार रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आसून अज्ञात चोरट्यावर भा.द.वि.कलम ४६१, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सावंत करीत आहेत.

रत्नागिरी मारुतीमंदिर येथील पान टपरीत चोरी
Categories : कोंकण Tags : कोंकण
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *