कोल्हापूर

शिरोली एम.आय.डी.सी.मध्ये सिलेंडरचा स्फोट; एक ठार, तर दोघे गंभीर जखमी

MahaNews LIVE
Jun 17 / 2018

कोल्हापूर : शिरोली एम.आय.डी.सी. येथील के. इंडस्ट्रीयल गॅसेस प्रा. लि. या कंपनीत कार्बन-डाय-ऑक्‍साईड सिलेंडरचा स्फोट होवून एक ठार तर दोघे गंभीर जखमी  झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. यामध्ये बिपीन कुमार आर्या  ( वय 30 रा.उत्तर प्रदेश, सध्या राहणार शिरोली एमआयडीसी तालुका हातकलंगडे) या कामगार स्फोटात जागीच ठार झाला. तर अमित वंजारे व वसंत परीट हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतची फिर्याद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात सचिन दिनकर पाटील(नेर्ली, महाकवे गल्ली ता. करवीर) यांनी दिली. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

शिरोली एम.आय.डी.सी.मध्ये सिलेंडरचा स्फोट; एक ठार, तर दोघे गंभीर जखमी
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *