कोंकण

आँल महाराष्ट्र फोटोग्राफर्स असोसिएशन च्या रत्नागिरी तालुका सभा उत्साहात संपन्न

MahaNews LIVE
Jun 17 / 2018

रत्नागिरी:- आँल महाराष्ट्र फोटोग्राफर्स असोसिएशन च्या रत्नागिरी तालुका शाखेची सभा रत्नागिरी येथील हाँटेल विठ्ठला यांचे सभागृहात घेण्यात आली.असोसिएशन च्या कोकण विभाग प्रमुख गुरु चौगुले आणि उपतालुका प्रमुख सचिन सावंतयांच्या उपस्थितीत तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख कांचन मालगुंडकर,यांचे अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील सुमारे ३० फोटोग्राफर्स उपस्थित होते. असोसिएशन चे कार्य तालुक्यात जोमाने करणेबाबत विचारविनिमय करण्यात आला.शिवाय जागतिक फोटोग्राफी दिना निमित्ताने करावयाच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा करून तालुक्यात भक्कम संघटन निर्माण करणेबाबत सभेत निर्णय घेण्यात आला. असोसिएशन च्या सहकार्याने तालुका व जिल्हा पातळीवर विविध कार्यक्रम घेणेबाबतही चर्चा करण्यात आली.तालुक्यातील पहिल्या सभेला लाभलेल्या या उत्साही उपस्थिती बद्दल कोकण विभाग प्रमुख गुरू चौगुले यांनी उपस्थित फोटोग्राफर्स यांना धन्यवाद दिले भविष्यात तालुक्यातील सर्व फोटोग्राफर्स आपल्या सोबत राहतील असा विश्वास कांचन मालगुंडकर यांनी व्यक्त केला.

आँल महाराष्ट्र फोटोग्राफर्स असोसिएशन च्या रत्नागिरी तालुका सभा उत्साहात संपन्न
Categories : कोंकण Tags : कोंकण
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *