थोडक्यात महत्वाचे

पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या धर्म वाचवण्यासाठी केली; परशुराम वाघमारेची कबुली

MahaNews LIVE
Jun 16 / 2018

बंगळुरु : आपण पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या केवळ धर्म वाचवण्यासाठी केली असल्याची कबुली परशुराम वाघमारे याने दिली, असा दावा कर्नाटक एसआयटीने केला आहे. विशेष म्हणजे, गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी आपण बेळगावात ट्रेनिंग घेतल्याची कबुलीही परशुरामने दिली. गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी परशुरामला नेमक्या कुठल्या संघटनेनं किंवा संस्थेनं ही कामगिरी सोपवली? त्यामागे कुणाचा हात आहे? याबाबत कुठलीही माहिती अद्याप एसआयटीने दिली नाही. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी परशुरामला महाराष्ट्रातून अटक कऱण्यात आली आहे.

पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या धर्म वाचवण्यासाठी केली; परशुराम वाघमारेची कबुली
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *