थोडक्यात महत्वाचे

कोर्टाच्या परिसरातच बायकोचा नवऱ्याने चिरला गळा !

MahaNews LIVE
Jun 16 / 2018

दिब्रुगड : बलात्कारी नवऱ्याने कोर्टाच्या परिसरातच बायकोची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना आसाममधील दिब्रूगड कोर्टात घडली आहे. आपल्यावर मुलीच्या बलात्काराचा खोटा आरोप लावल्यानेच आपण बायकोला ठार मारल्याचं आरोपीचं म्हणणं आहे.नऊ महिन्यांपूर्वी आरोपीने पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला होता. या आरोपांनंतर त्याला अटक करण्यात आली. याच प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होती.आरोपीने सुनावणीदरम्यान धारदार शस्त्राने कोर्टातच आपल्या बायकोचा गळा चिरला. या घटनेनंतर बायकोला लगेचच रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. प्रवासादरम्यानच दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला.

कोर्टाच्या परिसरातच बायकोचा नवऱ्याने चिरला गळा !
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *