कोल्हापूर

देखभाल, दुरूस्तीला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरण पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांचे निर्देश

MahaNews LIVE
Jun 16 / 2018

कोल्हापूर, दि. 15 जून, 2018 – विजेचे वाढते अपघात टाळण्यासाठी देखभाल, दुरूस्तीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत महावितरणच्या सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख करण्यासाठी प्रत्येकाने सचोटीने प्रयत्न करण्याचे आवाहन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी केले आहे. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात शुक्रवारी दुपारी आयोजित कोल्हापूर परिमंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता श्री. किशोर परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री. ताकसांडे म्हणाले, ‘कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात वीज अपघातांचे प्रमाण जास्त आहे. एकाच कुटुंबातील दोन, तीन व्यक्ती जाणे दुर्दैवी आहे. जिवाचे मोल पैशाने करता येत नाही. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी ज्या-ज्या आवश्यक उपाययोजना कराव्या लागतील त्या कराव्यात. अपघात प्रवण क्षेत्र शोधून आराखडा बनवा. अशा कामी निधीची कमतरता पडणार नाही. सोबतच ग्राहकाला त्याच्या वापरानुसार अचूक व वेळेवर वीजबिले दिले पाहिजे. तसेच ते भरण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला पाहिजे. परंतु, एप्रिल व मे महिन्यात परिणामकारक वसूली झालेली नाही. ही वाढलेली थकबाकी जून अखेर वसूल करा.’ महावितरण यंत्रणा बहुअंशी ऑनलाईन झाली आहे. मानवी हस्तक्षेप दिवसेंदिवस कमी होत असून येथून पुढे ग्राहकसेवेचा काळ आहे. ग्राहकाला 24 तास अखंडित पुरवठा करणे, तक्रारींचे वेळेत निराकरण करणे काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने सचोटीने काम करण्याचे आवाहनही श्री. ताकसांडे यांनी केले. बैठकीस महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. आलोक गांगुर्डे, अधीक्षक अभियंते श्री. वादिराज जहागिरदार, श्री. अंकुर कावळे, श्री. शैलेंद्र राठोर, श्री.संजय साळे, श्री. मनोज विश्वासे आदींसह अभियंते, अधिकारी उपस्थित होते. [15/06, 8:44 p.m.] Naim Kacchi Sir: देखभाल, दुरूस्तीला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरण पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांचे निर्देश कोल्हापूर, दि. 15 जून, 2018 – विजेचे वाढते अपघात टाळण्यासाठी देखभाल, दुरूस्तीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत महावितरणच्या सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख करण्यासाठी प्रत्येकाने सचोटीने प्रयत्न करण्याचे आवाहन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी केले आहे. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात शुक्रवारी दुपारी आयोजित कोल्हापूर परिमंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता श्री. किशोर परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री. ताकसांडे म्हणाले, ‘कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात वीज अपघातांचे प्रमाण जास्त आहे. एकाच कुटुंबातील दोन, तीन व्यक्ती जाणे दुर्दैवी आहे. जिवाचे मोल पैशाने करता येत नाही. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी ज्या-ज्या आवश्यक उपाययोजना कराव्या लागतील त्या कराव्यात. अपघात प्रवण क्षेत्र शोधून आराखडा बनवा. अशा कामी निधीची कमतरता पडणार नाही. सोबतच ग्राहकाला त्याच्या वापरानुसार अचूक व वेळेवर वीजबिले दिले पाहिजे. तसेच ते भरण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला पाहिजे. परंतु, एप्रिल व मे महिन्यात परिणामकारक वसूली झालेली नाही. ही वाढलेली थकबाकी जून अखेर वसूल करा.’ महावितरण यंत्रणा बहुअंशी ऑनलाईन झाली आहे. मानवी हस्तक्षेप दिवसेंदिवस कमी होत असून येथून पुढे ग्राहकसेवेचा काळ आहे. ग्राहकाला 24 तास अखंडित पुरवठा करणे, तक्रारींचे वेळेत निराकरण करणे काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने सचोटीने काम करण्याचे आवाहनही श्री. ताकसांडे यांनी केले. बैठकीस महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. आलोक गांगुर्डे, अधीक्षक अभियंते श्री. वादिराज जहागिरदार, श्री. अंकुर कावळे, श्री. शैलेंद्र राठोर, श्री.संजय साळे, श्री. मनोज विश्वासे आदींसह अभियंते, अधिकारी उपस्थित होते.

देखभाल, दुरूस्तीला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरण पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांचे निर्देश
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *