कोल्हापूर

महाराष्ट्र बहुजन सेनेचे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

MahaNews LIVE
Jun 16 / 2018

कोल्हापूर : विहिरी मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांना नग्न करून त्यांची गावातून धिंड काढल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी या गावांमध्ये घडली होती. सदरची घटना ही समाजाला काळीमा फासणारी असून अशा घटना यापुढे होऊ नयेत यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र बहुजन सेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बहुजन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश शिंदे, शहराध्यक्ष धनाजी सकटे, सुरेश वाडकर, आकाश भालेकर, शिवाजी सकटे, श्रीकांत जाधव, दिगंबर खुडे उपस्थित होते.

महाराष्ट्र बहुजन सेनेचे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *