हटके

पोलो,एमीओ आणि वेंटो च्या स्पोर्ट्स एडि‍शन लॉन्च; टेस्ट ड्राइव करा आणि जिंका कार

MahaNews LIVE
Jun 15 / 2018

नवी दि‍ल्ली:-फॉक्‍सवैगन ने भारतामध्ये पोलो, एमीओ आणि वेंटो चे खास एडि‍शन लॉन्च केले आहेत.जर्मनी ची कार कंपनी असलेल्या फॉक्‍सवैगन ने आपल्या लोकप्रिय कार असलेल्या पोलो, एमीओ आणि वेंटो कार मध्ये काही खास बदल केले आहेत ज्याला की स्पोर्ट एडिशन म्हटले जाते. या तीनही कारच्या स्पोर्ट एडि‍शन मध्ये काही स्टालइलि‍श फीचर्स दिले आहेत.या गाड्यांमध्ये ग्लॉेसी ब्लॅक रूफ फॉइल, स्टाइलि‍श साइड फॉइल, ब्लॅक रीयर स्पॉयलर आणि कार्बप फि‍नश ओआरवीएम कॅप आहे. पोलो, एमीओ आणि वेंटो च्या स्पोर्ट्स एडि‍शन मध्ये डीजाइन शिवाय कोणतेच विशेष बदल केले नाही आहेत. या तीनही मॉडल्सच्या खास एडि‍शन भारतात कोणत्याही अति‍रि‍क्त चार्जेस शिवाय फॉक्‍सवैगन ने आपल्या सर्व डीलरशि‍प आऊटलेट मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. टेस्ट ड्राइव करा आणि जिंका कार याचबरोबर फॉक्‍सवैगन ने आपले ३६० डि‍ग्री मार्केटिंग कॅम्पेन #बी अ स्पोर्ट हे सुद्धा लॉन्च केले आहे. या कॅम्पेन नुसार फॉक्स वैगन कार ची टेस्ट ड्राइव करणाऱ्या ग्राहकांना #बी अ स्पोर्ट या कॅम्पेनबरोबरच स्लोगन लिहून देणे आवश्यक आहे. यातील एका लकी वि‍जेत्याला फॉक्‍सवैगन ची स्पो‍र्ट एडि‍शन कार जिंकण्याची संधी मिळणार आहे.

पोलो,एमीओ आणि वेंटो च्या स्पोर्ट्स एडि‍शन लॉन्च; टेस्ट ड्राइव करा आणि जिंका कार
Categories : हटके Tags : हटके
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *