हटके

आता हार्ट अटॅक येण्या अगोदरच उपचार शक्य

MahaNews LIVE
Jun 14 / 2018

मुंबई : जोपर्यंत आपल्याला हृदय विकाराचा झटका येत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की हृदय विकाराचा आजार जडला आहे की नाही परंतु मुंबई आयआयटीने यावर एक नामी शक्कल काढत एक नवीन यंत्र तयार केलं आहे.आपल्याला हृदय विकाराच्या धोक्याची पातळी कळावी आणि त्यावर उपचार तातडीने घेता यावे यासाठी मुंबई आयआयटीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यानी यावर संशोधन करून एक नवीन यंत्र बनवलं आहे.या यंत्राच्या मदतीने आपण आपल्या स्मार्टफोनवरही ही चाचणी करु शकतो.बायोसायन्स आणि बायोइंजिनीअरिंगचे प्राध्यापक सौम्य मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली देबास्मिती मोंडल आणि सौरभ अग्रवाल या दोन विद्यार्थ्यांनी हे यंत्र तयार केलं आहे.

आता हार्ट अटॅक येण्या अगोदरच उपचार शक्य
Categories : हटके Tags : हटके
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *