उपहारापूर्वीच धवनने केले शतक
MahaNews LIVE
बंगळुरु: भारताचा सलामीवीर शिखर धवनने आपल्या धडाकेबाज खेळीत अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीत शतक झळकावलं आहे. पहिल्या दिवशीच उपहारापूर्वी शतक झळकावणारा धवन हा जगातील सहावा, तर पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. धवनने अवघ्या 87 चेंडूत शतक झळकावलं. या कसोटीत कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय सलामीवीर धवन आणि मुरली विजयने सार्थ ठरवला. धवनने आधी 47 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. मग त्याने धावगती वाढवत अवघ्या 87 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याच्या शतकामध्ये 18 चौकार आणि तीन उत्तुंग षटकारांचा समावेश आहे.

- Comments
- Leave your comment