हटके

बीएमडब्लूची एक्स ३ पेट्रोल वेरिएंट भारतात झाली लॉन्च

MahaNews LIVE
Jun 13 / 2018

नवी दिल्ली-बीएमडब्लू या जर्मन लक्झरी कार कंपनी ने आपल्या नव्या एक्स ३ स्‍पोर्ट्स यूटिलि‍टी व्‍हीकलचे पेट्रोल वेरिएंट लॉन्च केले आहे. त्याची किंमत भारतात ५६.९ लाख रुपये (एक्‍स शोरूम) आहे.बीएमडब्लू इंडि‍याच्या चेन्नई येथील प्लॅन्टमध्ये ही कार बनविण्यात येत आहे. नव्या बीएमडब्लू एक्स ३ मध्ये दोन लीटरचे चार सि‍लेंडर पेट्रोल इंजिन आहे. ते २५२ एचपी पॉवर जेनरेट करते. ही कार केवळ ६३.३ सेकंदात 0 ते १०० कि‍मी प्रती तासाचा वेग घेते . या इंजिनसोबत ८ स्‍पीड ऑटोमॅटि‍क ट्रान्समि‍शन आहे. तसेच नव्या बीएमडब्लू एक्स ३ मध्ये अॅडव्हास सेफ्टी टेक्नोलॉजीचा म्हणजेच एटेंटि‍व्‍नेस असि‍स्‍टेंस, डायनॅमि‍क स्‍टेबि‍लि‍टी कंट्रोल याचा समावेश आहे. याशिवाय कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल , इलेक्‍ट्रि‍क पार्किंग ब्रेकसोबत ऑटो होल्ड आणि साईड इम्पॅक्ट प्रोटेक्शनशिवाय सहा एअरबॅग मिळत आहेत.

बीएमडब्लूची एक्स ३ पेट्रोल वेरिएंट भारतात झाली लॉन्च
Categories : हटके Tags : हटके
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *