पुणे

शिवणे मध्ये रिक्षाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ज्येष्ठाचा मृत्यु

MahaNews LIVE
Jun 13 / 2018

पुणे - एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात एका पादचारी ज्येष्ठाला रिक्षाने ठोकरल्याने ज्येष्ठाचा मृत्यू झाला. याबाबत उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारास अटक करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शांताण्णा भोजराव पाटील (वय.६० रा.देशमुखवाडी, शिवणे, पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे नाव असून, शिवलीला मेलकुंदे (वय.३० रा.देशमुखवाडी, शिवणे, पुणे) यांनी उत्तमनगर पोलिसात तक्रार दिली आहे. तर रिक्षाचालक अनुज अशोक कनोजिया (वय.३१) आणि त्याचा साथीदार तरबेज मोती रेहमान (वय.२१ रा.दोघेही रा.हडपसर, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

शिवणे मध्ये रिक्षाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ज्येष्ठाचा मृत्यु
Categories : पुणे Tags : पुणे
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *