कोंकण

राजापूर महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी मंगेश परांजपे यांची निवड

John Smith
Jun 13 / 2018

राजापूर प्रतिनिधी:- रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघाच्या राजापूर तालुकास्तरीय कार्यकारिणीची बैठक १२ जून रोजी तहसीलदार कार्यालय येथे पार पडली. सदर बैठकीत राजापूर तालुक्याची पुढील वर्षाकरिता कार्यकारिणी तयार करण्यात आली. तहसील कार्यालयातील अव्वल कारकून मंगेश परांजपे यांची सलग तिस-यांदा बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्ष म्हणून आर.एन.शिंदे, उपाध्यक्ष म्हणून एस.डी.घडशी, सरचिटणीस म्हणून विकास पिठलेकर, खजिनदार म्हणून डी.एस.नागरेकर, चिटणीस म्हणून एम.आर.प्रभुलकर, एस.एस.बिर्जे, महिला प्रतिनिधी म्हणून श्रीमती एन.ए. गुरव व चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून एम.एस.पाटणकर यांची निवड करण्यात आली.

राजापूर महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी मंगेश परांजपे यांची निवड
Categories : कोंकण Tags : कोंकण
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *