कोंकण

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम: मनोज चव्हाण

John Smith
Jun 13 / 2018

रत्नागिरी प्रतिनिधी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १४ जून रोजी होणा-या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस डॉ.मनोज चव्हाण यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत दिली. राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे अन्य वस्तू, जिवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे या बाबीचा निषेध म्हणून तसेच राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर चार रुपये स्वस्त दराने पेट्रोल, डिझेल वितरीत करण्यात येणार आहे. १४ जून रोजी ज्या किंमतीला पेट्रोलचा दर आहे त्याच्यापेक्षा चार रुपये कमी करुन पेट्रोल वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी ठराविक पेट्रोल पंपांवर नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १४ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ज्या माता मुलींना जन्म देतील अशा मातांच्या नावे त्या नवजात मुलीच्या भविष्यातील खर्चाला हातभार म्हणून एक ठराविक रक्कम बँक खात्यात फिक्स्ड डिपॉझिट करुन देण्यात येणार आहे. अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या सुविधांचा तमाम नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. मनोज चव्हाण यांनी केले आहे.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम: मनोज चव्हाण
Categories : कोंकण Tags : कोंकण
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *