कोंकण

रत्नागिरी शहर पोलिसांच्या वतीने इफ्तार पार्टी

John Smith
Jun 13 / 2018

रत्नागिरी प्रतिनिधी:- जून महिना हा रमजान चा पवित्र महिना असून सर्व तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रीया रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षक प्रणय अशोक यांनी व्यक्त केली. रत्नागिरी शहर पोलिसांच्या वतीने उद्यमनगर येथे पवित्र रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तमाम मुस्लिम बांधवांना निमंत्रीत करुन त्यांना पोलिसांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावळी अप्पर पोलिस अधिक्षक मितेष घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक अनिल विभुते आदी मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी शहर पोलिसांच्या वतीने इफ्तार पार्टी
Categories : कोंकण Tags : कोंकण
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *