कोल्हापूर

भिडे गुरुजींच्या वक्तव्याबाबत आंबे दाखवू निदर्शने

John Smith
Jun 13 / 2018

कोल्हापूर : मूल होण्यासाठी माझ्या शेतातील आंबे खा, असे वादग्रस्त वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठानचे हिंदुस्थान सभेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केल्यानेे भिंडेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिष्ठ पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान मध्यवर्ती बसस्थानक येथे आंबे दाखवून निदर्शने करण्यात आली. मूल होत नसलेल्यांनी आपला वेळ, पैसा खर्च करण्याची गरज नाही, तर माझ्या शेतातील झाडाचे आंबे खाल्ले तरी अपत्यप्राप्ती होईल. लग्न होऊन आठ-आठ वर्षे झाली तरी पोर होत नाही अशा स्त्री-पुरूष, पती पत्नींनी ती फळे खाल्ली तर निश्चित पोरं होतात असं झाड आहे माझ्याकडे. मी आतापर्यंत 180 जोडप्यांना हा आंबा दिला, त्यांना पत्थ सांगितले. त्यापैकी 150 जोडप्यांना मूल झाले असल्याचे ते म्हणाले होेते. त्याबद्दल त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा भारतीय कम्युनिष्ठ पक्षाच्या वतीने आंबे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी काॅम्रेड रघुनाथ कांबळे, कॉम्रेड बाबा ढेरे, सुमन पाटील आदी उपस्थित होते.

भिडे गुरुजींच्या वक्तव्याबाबत आंबे दाखवू निदर्शने
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *