कोल्हापूर

पालिकेसमोर धरणे आंदोलन

John Smith
Jun 13 / 2018

कोल्हापूर : महापालिका तत्कालिन आयुक्त व्दारकादास कपुर यांनी गरीब कुटुंबाना उदरनिर्वाहासाठी केबीन लायसन्स दिल्या आहेत. पण महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांकडून या केबिनचे अतिक्रमण होत असल्याचे असल्याचे सांगितले जात आहे, याच्या निषेधार्थ आज बहुजन परिवर्तत पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या वतीने महानगरपालिकेच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार येथील अमिना नुरानी यांची चहाची गाडी काढण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांकडून धमकावण्यात येत आहे. शिवाय कपड्याचे दुकान व साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्याकडून जप्त केलेले साहित्य परत देण्यासाठी बेकायदेशीरपणे 400 रूपये दंड भरून घेण्यात आला. त्याचबरोबर अन्य काही लोकांची अतिक्रमणे काडल्यावर पावती दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान केबिन बसवून लोकांच्याकडून पैसे काढण्याचा धंदा महापालिकेचे काही कर्मचारी करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे. यावेळी महिला राज्य अध्यक्षा मनीषा नाईक, शोभा नलवडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान दाभाडे, रमेजा शेख, बसजीराव नाईक आदी उपस्थित होते.

पालिकेसमोर धरणे आंदोलन
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *