कोंकण

रत्नागिरीतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक

John Smith
Jun 13 / 2018

रत्नागिरी प्रतिनिधी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर तर्फे दिनांक १२ जून २०१८ रोजी रत्नागिरी शहर मुख्यरस्त्यावर आठवडा बाजार , तेली आळी नाका , जेल नाका चढाव , साळवी स्टॉप जलतरण तलाव येथे बसणारे अनधिकृत परप्रांतिय फेरीवाले येत्या १५ दिवसात हटवून रत्नागिरी शहराचे विद्रुपीकरण रोखावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने हा प्रश्न सोडविण्यात येईल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.याप्रसंगी रत्नागिरी उपशहरअध्यक्ष अरविंद मालाडकर , शहरसचिव विश्वजीत सावंत , विभागअध्यक्ष उन्मेश माळवदे व सतीश खामकर , शाखाध्यक्ष सर्वेश जाधव , कामगार सेना चिटणीस अजित पाटील व सुनील साळवी , म.न.वि.से.तालुकाध्यक्ष गुरु प्रसाद चव्हाण इत्यादी उपस्थित होते .

रत्नागिरीतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक
Categories : कोंकण Tags : कोंकण
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *