कोंकण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा ह्रदय सोहळा

John Smith
Jun 13 / 2018

रोहा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २० वा स्थापना दिन सर्वत्र जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्त गेली १९ वर्षे पक्षासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचा पक्षाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनी सन्मानचिन्ह प्रदान करत सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत रोहा नगरपरिषदेतील गटनेते मयूर दिवेकर, शहराध्यक्ष अमित उकडे, नगरसेवक महेश कोल्हटकर, नगरसेविका स्नेहा आंब्रे, नेहा पिंपळे, सचिन चाळके, सागर भोबड, विनीत वाकडे, चंद्रकांत पार्टे, सलील खातु,रिया शेट्टे,सुजाता चाळके, परेश दमानी,नीता पडवळ,महेंद्र गुजर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांचे विचार, पक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम निस्वार्थीपणे अहोरात्र करीत पडतीच्या वेळेसदेखील पक्षासोबत खंबीरपणे उभे राहणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. यावेळी ४५ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. पक्षाच्या जडघडणीत नेते व पदाधिकारी यांचा जेवढा वाटा असतो तेवढाच महत्त्वाचा वाटा असतो तो पक्षाला मोठं करणाऱ्या या कार्यकर्त्यांचा! पक्षाच्या १९ वर्षाच्या कार्यकाळात सत्तेत असताना आणि आता विरोधात असतानाही पक्षासोबत एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सत्काराचा हा ह्रदय सोहळा पाहताना तसेच हा सन्मान स्विकारतांना अनेकांना गहिवरून आले. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनी सामान्य कार्यकर्त्यांचा केलेल्या या आगळ्या वेगळ्या सन्मानाची सर्वत्र चर्चा होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा ह्रदय सोहळा
Categories : कोंकण Tags : कोंकण
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *