कोल्हापूर

वृद्धेचे हात-पाय बांधून लाखो रुपये लंपास

John Smith
Jun 11 / 2018

कोल्हापूर : वृद्धेचे हात-पाय बांधून, तोंडात कापडाचा बोळा कोंबून चोरट्याने साडेनऊ लाख रुपयांची चोरी केली. उचगाव येथे रविवारी भरदिवसा हा धक्कादायक प्रकार घडला. तोंडाला मास्क घालून आलेल्या चोरट्याने रोख साडेसहा लाख रुपये आणि ग्रॅम सोन्याचे दागिने असा मुद्देमाल लुटून नेला. लालूबाई भगवान पवार (वय ८० रा. उचगाव ता. करवीर,साई कॉलनी ) असे जखमी वृद्धेचे नाव आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलिसांत नोंद झाली आहे. उचगाव येथे राहणारे नामदेव भगवान पवार गेल्या आठ ते दहा वर्षांपासून वीटभट्टीचा व्यवसाय करतात. ८० वर्षांची त्यांची वृद्ध आई लालूबाई या एकट्याच घरी असतात. शनिवारी नेहमीप्रमाणे घरातील इतर लोक वीटभट्टीवर गेले होते. लालूबाई या जेवण करून विश्रांती घेत होत्या. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घराची बेल वाजल्याने लालूबाई यांनी दार उघडताच चोरट्याने त्यांच्या डोक्यात बुक्की मारली. जखमी होऊन त्या जमिनीवर कोसळल्या. त्यानंतर चोरट्याने लोखंडी तिजोरीचे दार कटावणीने उचकटून त्यातील रोख ६ लाख ६० हजार रुपयांची रक्कम आणि कपाटातील दागिन्यांचा डबा असा सुमारे साडेनऊ लाखांचा ऐवज घेऊन पलायन केले. नामदेव पवार घरी आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. रविवारी संध्याकाळी गांधीनगर पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली.

वृद्धेचे हात-पाय बांधून लाखो रुपये लंपास
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *