संपादकीय

पेन्शनवाढीचा विचार कधी ?

प्रतिनिधी
Apr 13 / 2018

महाराष्ट्रातील आमदारांनी नुकतेच ‘एकमताने आपल्या वाढीव पगाराच्या मागण्या मान्य करून घेतल्या असे वाचनात आले. याचबरोबर संजय गांधी, श्रावण बाळ इ. लाभार्त्यांच्या पेन्शनवाढीच्या मागण्या गेली कित्येक महिने चालू आहे. परंतु अद्याप याबाबत काहीच घडत नाही. या लाभार्त्यांपैकी जास्तीत जास्त लोक सत्तरीच्या पुढेच आहेत व जास्त लाभार्थी निव्वळ याच पैशावर तग धरून आहेत. महागाई रोज वाढतीच आहे त्यामुळे हे लोक या पैशात कसे जीवन कंठत आहेत सगळ्या आमदारांनी याचा विचार करून पेन्शनवाढीचाही निर्णय घेतला असता तर या जेष्ठांनी त्यांना आशीर्वाद दिले असते.  

पेन्शनवाढीचा विचार कधी ?
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *