जगावेगळे

बँकॉक २०३० पर्यंत पाण्यात बुडण्याची शक्यता!

प्रतिनिधी
Sep 03 / 2018

पंधराव्या शतकात आयुथाया राजवटीत बँकॉक हे चाओफ्राया नदीच्या मुखाजवळ वसलेले एक छोटे व्यापारी केंद्र होते. वाढत वाढत त्याची १७६८ मध्ये थोन्बुरी व १७८२ मध्ये रत्तनकोसिन अशा राजधान्या झाल्या. यानंतर भौगोलिकरीत्या महत्त्वाचे ठिकाण म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले आणि त्यानंतर बँकॉकने स्वतंत्र, प्रवाही वजनदार शहर म्हणून ख्याती कमावली. पण आता हाच देश संपुष्टात येण्याची शक्यता आहे. २०३० पर्यंत पाण्यात बुडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. दलदलीच्या जमिनीवर वसलेला हा देश समुद्रापासून पाच फुटाच्या उंचीवर आहे. त्यामुळे समुद्राची पाण्याची पातळी वाढणे या देशासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. बँकॉकची राजधानी थायलंड शहराजवळी खाडी शेजारी असणाऱ्या समुद्राच्या पाण्याची पातळी दरवर्षी वाढत चालली आहे. ग्रीनपीस चे तारा बुआकामसरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात अतिवृष्टी मुळे बदलत्या वातावरणामुळे बँकॉकचा ४० टक्के भाग पाण्यात बुडण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार राजधानी दरवर्षी एक-दोन सेंटी मीटरने पाण्यात बुडत चालली आहे. यासर्व कारणास्तव बँकॉकला गंभीर इशारा देण्यातआला आहे.