मुंबई

नितीन देसाई यांच्या स्टुडिओला भीषण आग

John Smith
May 07 / 2021

मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जतमधील स्टुडिओला भीषण आग लागली आहे. हा सेट जोधा अकबर सिनेमाच्या सेटजवळ आहे. फायबर मूर्तींचे गोदाम आणि फायबर सेट यांना आग लागली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान आग लागली. लांबून आगीचे उंचच उंच लोळ दिसत आहेत. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या पोहोचल्या आहेत. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत जीवितहानी झालेली नाही पण वित्तहानी झाली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही.