पेज३

अजय साकारणार विंग कमांडरची भूमिका

प्रतिनिधी
Mar 20 / 2019

बॉलीवूड अभिनेता अजय देवगन आता विंग कमांडरची भूमिका साकारताना दिसणार आहे. तो विजय कार्णिक यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पाकिस्तानासोबत युध्दा्वर आधारित असलेल्या विषयावर आधारित हा चित्रपट आहे. १९७१ च्‍या भारत-पाक युद्धाच्‍या दरम्‍यान गुजरातच्‍या भुजमध्‍ये असणार्‍या धावपट्टीवर पाकिस्तानी एअरफोर्सने बॉम्‍ब फेकले होते. या भूज तळावरील धावपट्‍टी उद्‍ध्‍वस्‍त झाली. त्‍यावेळी कर्णिक यांनी धाडसी निर्णय घेत आजूबाजूच्‍या गावातील ३०० महिलांची मदत घेत हा तळ पुन्‍हा बांधला होता. ही शौर्यगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.