पावसाळी पर्यटन

बेलूर नगरी म्हणजे आदर्श वास्तूंचा नमुना

प्रतिनिधी
Sep 19 / 2018

हळेबिडूची जुळी बहीण म्हणून बेलूर नगरीला ओळखले जाते. येथे देखण्या चन्नकेशवाचे फार सुंदर मंदिर आहे.कर्नाटक राज्याच्या हसन जिल्ह्यातील बेलूर येथील मंदिरांची उभारणी करताना मजबुतीसाठी वापरलेले स्थापत्य अभियांत्रिकी तंत्र म्हणजे त्या वेळच्या बांधकाम शैलीचा आदर्श नमुना आहे.चन्नकेशव हे श्री विष्णूला समर्पित असे मंदिर आहे.श्रवणबेळगोळ येथे जैन मुनी बाहुबली यांच्या स्मरणार्थ कोरलेली भारतातील सर्वांत उंच (५७ फूट) जैन मूर्ती येथे आहे. चंद्रगिरी आणि विंध्यगिरी अशा दोन डोंगरांमधील विंध्यगिरीवर ही पहाडातील पाषाणामधील कोरीव मूर्ती आहे.हेमवती नदीवर ५८ मीटर उंच व ४६९२ मीटर लांबीचे धरण बांधून १९७९मध्ये पूर्ण करण्यात आले. धरणाच्या पाण्यात बुडालेले चर्च कर्नाटकमधील शेट्टीहल्ली येथून दोन किलोमीटर अंतरावर आहे.भारतात फ्रेंच मिशनऱ्यांनी १८६०च्या सुमारास बांधलेले हे चर्च गॉथिक वास्तुकलेतील एक भव्य रचना आहे.बेलूर हे ठिकाण चिकमंगळूरपासून ते २२ किलोमीटरवर आहे. म्हैसूरवरूनही बेलूर-हळेबिडूला जाता येते. चिकमंगळूर, शिमोगा, शृंगेरी, शरावती फॉल (जोग फॉल) ही ठिकाणेही आसपास पाहण्यासारखी आहेत.