कोल्हापूर

स्वामिनाथन आयोग लागू करू : अँड आण्णाराव पाटील.

John Smith
Oct 15 / 2019

स्वामिनाथन आयोग लागू करू : अँड आण्णाराव पाटील. महान्यूज लिव्ह कोल्हापूर : निवडणुका अगदी काही दिवसावर येऊन ठेपल्या असताना उशिरानेका होईना पण वंचित बहुजन आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करू , आशा स्वयंसेविकांचे वेतन १ हजार वरून ५ हजार इतके करू , होमगार्डना निमशासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊ, पोलिसांना फक्त ८ तास ड्युटी देऊ तसेच १६ लाख पोलीसभरती काढून तरुणांच्या हाताला काम देऊ हि उद्दिष्ठ्ये जाहीरनाम्यात ठेवण्यात आली आहेत .कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड आण्णाराव पाटील यांनी ही माहिती दिली. पत्रकार परिषदेत दयानंद ठाणेकर ,राहुल राजहंस तसेच अस्मिता दिघे अनिल म्हमाने उपस्थित होते.