महत्वाच्या घडामोडी

नीरव मोदीविरोधात लंडनच्या न्यायालयाने काढले अटक वॉरंट

प्रतिनिधी
Mar 20 / 2019

नवी दिल्ली –पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेल्या पळपुट्या नीरव मोदीविरोधात लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. नीरव मोदीला आता कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. गेल्या १२ मार्च रोजी ईडीने सांगितले होते की नीरव मोदीच्या प्रत्यर्पणासंबंधी आम्ही जोरदार प्रयत्न करत आहोत. अशातच वेस्टमिन्स्टर न्यायालयाने मोदीविरोधात वॉरंट जारी केले आहे. लंडन न्यायालयाने ही कारवाई ईडीच्या आरोपांनुसारच केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.